img
img
blog

17 February 2023

महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे

महाराष्ट्रातील मुंबईपासून ते गडचिरोलीपर्यंत असलेल्या विविधतेमुळे  इतर भारतीय राज्यातील आणि परदेशातील पर्यटक महाराष्ट्राकडे आकर्षित होतात. महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे (Maharashtratil Paryatan Sthal)  संपूर्ण देशात प्रसिद्ध आहेत.  2014 मध्ये हे परदेशी लोकांद्वारे सर्वात जास्त भेट दिलेले दुसरे आणि देशांतर्गत पर्यटकांनी भेट दिलेले चौथे राज्य ठरले होते. महाराष्ट्रातील ऐतिहासिक स्थळे व महाराष्ट्रातील प्रेक्षणीय स्थळे (Tourist Places In Maharashtra In Marathi) बघण्यासाठी लोक संपूर्ण देशातून महाराष्ट्रात येतात.  औरंगाबाद ही महाराष्ट्राची पर्यटन राजधानी आहे. ब्रिटिशांनी वसाहती काळात सरकारी अधिकाऱ्यांसाठी भारतातल्या तीव्र उन्हाळ्यात राहण्यासाठी अनेक हिल स्टेशन्स शोधून काढले. आता ही हिल स्टेशन्स (Paryatan Sthal In Maharashtra)  पर्यटकांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करतात. महाबळेश्वर, लोणावळा आणि माथेरान ही पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाची हिल स्टेशन्स (महाराष्ट्रातील पर्यटन ठिकाणे) आहेत. विदर्भात, चिखलदरा हे एकमेव हिल स्टेशन आहे. पश्चिम महाराष्ट्रातील डोंगराळ जिल्ह्यांत मराठा साम्राज्याच्या कालखंडातील शेकडो डोंगरी किल्ले आहेत. हे किल्ले आणि आजूबाजूच्या टेकड्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडातील असल्यामुळे ट्रेकिंग, गिर्यारोहण आणि हेरिटेज टूरिझममध्ये स्वारस्य असलेल्या लोकांमध्ये लोकप्रिय आहेत.ही महाराष्ट्रातील ऐतिहासिक स्थळे बघण्यात अनेकांना रस असतो त्यामुळे महाराष्ट्रातील पर्यटन स्थळाची माहिती मिळवण्यासाठी लोक आवर्जून या गडकिल्ल्यांना भेट देतात. त्यात शिवनेरी किल्ला, राजगड, सिंहगड, रायगड आणि प्रतापगड किल्ला यांचा समावेश होतो. याखेरीज महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरे जी महाराष्ट्राची शान आहे ती बघायलाही पर्यटक महाराष्ट्राला भेट देतात.

तसेच त्र्यंबकेश्वर, तुळजाभवानी मंदिर, शनी शिंगणापूर, ज्योतिबा मंदिर, अष्टविनायक गणपती मंदिरे, पंढरपूर येथील पांडुरंगाचे मंदिर या तीर्थस्थळांनाही लोक मोठ्या संख्येने भेट देतात.  औरंगाबादच्या आसपासच्या परिसरात अनेक प्राचीन आणि मध्ययुगीन स्थळे आहेत ज्यात अजिंठा आणि वेरूळ लेणी, दौलताबाद किल्ला आणि बीबी का मकबरा या युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांचा समावेश आहे. भारताच्या इतर भागातून यात्रेकरूंना आकर्षित करणारी प्रार्थनास्थळे नांदेड येथील हजूर साहिब शीख गुरुद्वारा, पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथील खंडोबा मंदिर आणि शिर्डी येथील साईबाबांचे मंदिर, पंढरपूर, देहू आणि आळंदी यांसारखी वारकरी संप्रदायाशी संबंधित ठिकाणे संपूर्ण महाराष्ट्रातील यात्रेकरूंना वर्षभर आकर्षित करतात. महाराष्ट्रात फिरता येणारे अप्रतिम समुद्रकिनारे आहेत. कोकण म्हणजे जणू स्वर्गच आहे, असा अनुभव कोकणात निसर्गाच्या सानिध्यात फिरताना येतो.

इतकेच नव्हे तर महाराष्ट्राच्या विदर्भात अनेक अभयारण्ये आहेत. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, नागपूर जिल्ह्यातील उमरेड कर्हांडला वन्यजीव अभयारण्य, नागझिरा वन्यजीव अभयारण्य आणि गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव राष्ट्रीय उद्यान यांचा समावेश आहे. याखेरीज मुंबई, कोकणातील पर्यटन स्थळे, कोल्हापूर, पुणे, नाशिक येथील पर्यटन स्थळेही प्रसिद्ध आहेत. चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांबद्दल! 

महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे यादी | List Of Tourist places in Maharashtra in Marathi

महाराष्ट्रात चांदा ते बांदा प्रत्येक जिल्ह्याची काही ना काही खासियत आहे. मग ते खाणेपिणे असो की ऐतिहासिक संदर्भ असो की निसर्गरम्य ठिकाण असो की धार्मिक स्थळ! चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध पर्यटन स्थळे कोणती आहेत. 

महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे | Maharashtratil Paryatan Sthal

महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे

  1. मुंबई 
  2. औरंगाबाद
  3. अजंता वेरूळ लेणी 
  4. महाबळेश्वर 
  5. पाचगणी 
  6. पंढरपूर 
  7. तुळजापूर 
  8. जेजुरी 
  9. आळंदी 
  10. अक्कलकोट 
  11. लोणावळा व खंडाळा 
  12. राजमाची
  13. शिर्डी 
  14. नाशिक 
  15. इगतपुरी
  16. माथेरान
  17. गणपतीपुळे 
  18. तारकर्ली 
  19. रत्नागिरी 
  20. अलिबाग
  21. काशीद व नागाव
  22. पुणे 
  23. लवासा
  24. कोलाड
  25. ताडोबा अभयारण्य , चंद्रपूर 
  26. नागपूर
  27. चिखलदरा 
  28. कोल्हापूर 
  29. भंडारदरा 
  30. रायगड 
  31. आंबोली 
  32. कामशेत 
  33. दुरशेत 
  34. मालवण 
  35. दिवेआगर 
  36. श्रीवर्धन 
  37. हरिहरेश्वर 
  38. रतनवाडी 
  39. मानोरी 
  40. चिपळूण 
  41. दापोली 
  42. मुरुड जंजिरा 
  43. माळशेज घाट 
  44. जव्हार 
  45. विक्रमगड 
  46. सावंतवाडी 
  47. तोरणमाळ 
  48. लोणार 
  49. नांदेड 
  50. ओझर 
  51. भामरागड वन्यजीव अभयारण्य 
  52. लातूर 
  53. सातारा 
  54. अहमदनगर 
  55. ताम्हिणी घाट 
  56. कुणकेश्वर

Share: